पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे

पार्श्वभूमी व स्थापना

         सभासदांना बचतीची सवय लावणे आणि गरजू सभासदांना माफक व्याजदराने सुलभरित्या कर्ज पुरवठा करणे” या दोन मुख्य उद्देशांनी पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन दि. ३१ जुलै १९६४ रोजी “पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे” या संस्थेची स्थापना केलेली आहे. पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित पुणे ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ नुसार नोंदणीकृत ‘सहकारी संस्था’ आहे.

          संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण ‘पुणे जिल्हा’ असून संस्थेचे सभासद जिल्हा परिषद मुख्यालय,  १३ पंचायत समित्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि पशुवैद्यकीय दवाखाने इत्यादी ठिकाणी कार्यरत आहेत. दि. ३१ मार्च, २०२५ अखेर संस्थेच्या एकूण सभासद संख्या २०६७ आहे. सध्या, संस्थेची एकमेव शाखा असून मुख्य कार्यालयातून दैनंदिन कामकाज सुरु आहे.

उद्दिष्टे -

          संस्थेच्या सभासदांना माफक दरात कर्ज पुरवठा, ठेवी, विमा संरक्षण इ. बँकीग सेवा उपलब्ध करुन देऊन सभासदांसाठी सर्व समावेशक समुह सुरक्षा योजना तयार करणे ही संस्थेची मुख्य उद्दिष्टे आहेत. संस्थेच्या दैनंदिन कामकाजात सुलभता आणण्यासाठी कामकाज प्रक्रियेचे सुसुत्रिकरण करुन त्यासाठी आवश्यक संगणक प्रणाली विकसित करणे आणि त्याचे संचालन व देखभाल करणे यासाठी संचालक मंडळ आग्रही आहे.

संस्थेचा व्यावसायिक आलेख -

अ.क्र.तपशिलदि. ३१/०३/२०११दि. ३१/०३/२०१७दि. ३१/०३/२०२५
सभासद३८१८३३०५२०६७
अधिकृत भाग भांडवल२०,००,००,०००/-१००,००,००,०००/-१,००,००,००,०००/-
वसुल भाग भांडवल१५,७८,९३,८९०/-३१,००,६३,५८१/-२८,९०,६६,८३०/-
काटकसर निधी४,९८,२८,२७०/-८,३३,७६,३१०/-२९,८२,०६,७७०/-
कर्ज वाटप१७,६५,१५,१२९/-५४,५२,३२,५१४/-१११,३१,६०,२३१/-
राखीव निधी४,९८,२२,६७८/-८,६८,४१,८६७.४२१२,७३,२९,४४६.२१
कुटूंब संरक्षण योजना निधी१,२८,०४,६५९/-५,४४,०३,७९२/-१९,०८,३१,३१७/-
आवर्तक ठेव योजना४०,४६,३२०/-१,२७,७४,१५८/-५५,७०,७७२/-
बँक व इतर शेअर्स१५,००,०००/-१,५०,०३,३५०/-४,००,०५,३५०/-
१०इमारत निधी२१,७०,५००/-२३,९५,५००/-१,४०,६३,०६१/-
११एकूण उत्पन्न ७,११,१६,१७४/-८,३७,६३,३७०.५०
१२निव्वळ नफा१,६९,३७,४२०.०१२,९०,८६,५०१.२७१,६४,९४,७७७.६८/-
१३खेळते भाग भांडवल३१,६१,८२,२७९.३३७१,२२,९१,९१२.८११३७,८२,७१,८७४.२०

 

संस्थेचे महत्वपूर्ण निर्णय -

1) कर्ज मर्यादा -

अ.क्र.कर्जाचा प्रकारमर्यादापरतफेडीचा कालावधीशेरा
मोठे कर्जर. रु. ३० लक्ष२४० महिने (२० वर्षे) 
तातडी कर्जर. रु. ८० हजार१२ महिने 
गृह कर्जर. रु. २० लक्ष२४० महिने (२० वर्षे)

गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन कर्ज आणि पर्यटन कर्ज प्रकार मंजूर असून कर्जाच्या नियमांना

मान्यता मिळालेली आहे. तथापि सर्वसाधारण (वैयक्तीक) कर्जाची मर्यादा वाढविल्यामुळे 

अद्याप या कर्जांचे वितरणास सुरुवात केलेली नाही.

शैक्षणिक कर्जर. रु. ७ लक्ष८४ महिने ( वर्षे)
वाहन कर्जर. रु. ९ लक्ष८४ महिने ( वर्षे)
पर्यटन कर्जर. रु. २ लक्ष६० महिने ( वर्षे)

 

) सभासद संरक्षण योजना -

२.१) कुटूंब संरक्षण योजना - सभासदांना मासिक १००० रुपये वर्गणीमध्ये संपूर्ण कालावधीत र. रु. १० लक्ष विमा कवच. सेवानिवृत्त / राजीनामा दिल्यास योजनेपोटी जमा रकमेच्या दुप्पट रक्कम सभासदास परत करण्यात येते. सन २०११ - २०१२ ते २०२४ - २०२५ या कालावधीत एकूण १९२ मयत सभासदांच्या वारसांना र.रु. १०.१६ कोटी इतका लाभ देण्यात आलेला आहे. सेवानिवृत्त / राजीनामा दिलेल्या सभासद व त्यांना दिलेल्या जमा रकमेच्या दुप्पट रक्कम लाभाची रक्कम वेगळी आहे.

२.२) सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजना - सन २०१८ - २०१९ पासून सभासदांना वार्षिक १००० रुपये वर्गणीमध्ये एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत र. रु. लक्ष विमा कवच देणारी सभासद मृत्यूफंड व कर्जमाफी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेतून सन २०१८ - २०१९ ते २०२४ - २०२५ या वर्षांच्या कालावधीत एकूण ८० मयत सभासदांच्या वारसांना र. रु. .६० कोटी इतका लाभ देण्यात आलेला आहे.

२.३) सभासद आपत्कालीन मदत निधी योजना - सन २०१८ - २०१९ पासून सभासदांना वार्षिक ६०० रुपये वर्गणीमध्ये एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत अपघात झाल्यास औषधोपचारासाठी र. रु. ५० हजार मदत करण्यात येते. या योजनेतून सन २०१८ - २०१९ ते २०२४ - २०२५ या  वर्षांच्या कालावधीत एकूण ४२ सभासदांना / मयत सभासदांच्या वारसांना र. रु. १८.६२ लक्ष इतका लाभ देण्यात आलेला आहे. सभासदांना या दोनही योजनांसाठी स्वत: वेगळी वर्गणी भरण्याची आवश्यकता नाही. दरवर्षी संस्थेकडे सभासदांच्या जमा वार्षिक वर्गणीतून ३१ मार्च रोजी सभासद मृत्यूफंड व सभासद आपत्कालीन मदत निधी या दोन्ही योजनांच्या वर्गणीची रक्कम कपात करुन घेण्यात येते.

२.४) सभासद कल्याण निधी योजना - मयत सभासदाच्या अंत्यविधीसाठी या योजनेतून सभासदाच्या वारसांना र. रु. १५ हजार मदत करण्यात येते.

 

) व्याज दरात % सवलत - 

          संस्थेने कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांसाठी सन २०२३ - २०२४ पासून व्याज दरात % सवलत देण्यास सुरुवात केलेली आहे. सन २०२३ - २०२४ व सन २०२४ - २०२५ मध्ये अनुक्रमे र. रु. ४५,६२,८९६/- व र. रु. ६०,१२,६९१/- इतक्या रकमेचा लाभ देण्यात आलेला आहे.

 

) सभासदांच्या पाल्यांसाठी (मुलांसाठी) वसतिगृह व गुणगौरव - 

          संस्थेने पुणे शहरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या सभासदांच्या पाल्यांसाठी २४ बेडचे सर्व आवश्यक सोईंनी सुसज्ज असे वसतिगृह तयार केलेले आहे. निवासासोबतच वसतिगृहात स्वतंत्र अभ्यासिका, संदर्भासाठी ग्रंथालय, वाचनालयाची अभ्यागत कक्ष, वसतिगृहाच्या देखरेखीसाठी CCTV कॅमेरे इ. सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. सभासदांच्या पाल्यांना विविध विषयांच्या तज्ञांमार्फत मार्गदर्शन व चर्चेसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. आगामी काळात सभासदांच्या मुलींसाठीही सोईंनी सुसज्ज असे वसतिगृह तयार करण्याचा मानस आहे.

          सभासदांच्या उत्तम शैक्षणिक यश प्राप्त केलेल्या पाल्यांचे दरवर्षी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणगौरव करुन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात येते.

 

दैनंदिन कामकाजात तंत्रज्ञानाचा वापर -

          संस्थेने जिल्हा परिषद विभागांना सभासदांचे दरमहाचे कपातपत्र व त्यानुसार कपात केलेली रक्कम व कपातपत्र वसूली संस्थेकडे पाठविण्यासाठी pzps.org या संकेतस्थळावर Demand Management System (DMS) ही Online संगणक प्रणाली उपलब्ध करुन दिलेली आहे. या प्रणालीचे उद्घाटन मा. श्री सुरज मांढरे, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आलेले असून ही प्रणाली डिसेंबर २०१८ पासून विनाखंड सुरु आहे.

          संस्थेच्या सभासद समर्पित पोर्टलद्वारे प्लॅटफॉर्मवर नवीन सभासद होण्यासाठी अर्ज, कर्ज मागणी, सभासदांच्या वैयक्तिक खात्याची माहिती, खाते उतारा, कर्ज थकबाकीबाबत दाखले, राजीनामा, KYC फॉर्म, वारसदार नेमणूक फॉर्म, नाव बदलणे, तक्रार निवारण इत्यादी विविध सेवा Online प्रदान करण्यात येणार असून त्याबाबत काम सुरु आहे. सहकार क्षेत्रात होत असलेल्या तांत्रिक प्रगतीला आणखी गती देण्यासाठी संस्था माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे नवनवीन व दर्जेदार सेवांची अंमलबजावणी करण्याबाबत प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

          संस्थेच्या अधिकाधिक सेवा डिजिटल स्वरुपात सभासदांना उपलब्ध करुन देण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. दर्जेदार सेवा आणि आवश्यक तेवढाच खर्च करण्यावर संस्थेचा भर असून त्यासाठी आगामी काळात माहिती तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व यंत्रणेचे बळकटीकरण करण्यावर संस्थेने लक्ष केंद्रित केलेले आहे. ज्यामुळे सभासदांचा वेळ वाचणार असून आर्थिक बचत होणार आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सभासदास सुविधांचा वापर करण्यासाठी प्रशिक्षण व प्रोत्साहन देणे, होणारे फायदे समजावून सांगणे यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

 

इतरांसाठी मार्गदर्शक -

          पुणे जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, पुणे ही पगारदार सेवकांच्या पतसंस्थांमध्ये पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य सहकारी संस्था आहे. सभासद हिताचा आणि सर्वांगिण प्रगतीचा विचार करुन संस्थेच्या सभासदांसाठी विविध समुह योजना तयार करण्यामागची संचालक मंडळाची प्रेरणा व भूमिका, योजनांची अंमलबजावणी आणि समुह सुरक्षा योजना राबवितानाचे आर्थिक गणित समजावून घेण्यासाठी आजवर जिल्ह्यातील तसेच राज्यातील अनेक नावाजलेल्या पतसंस्थांच्या संचालक मंडळांनी संस्थेला भेटी दिलेल्या आहेत.

 

ध्येयाप्रती वचनबद्धता -

          संस्था आपल्या सभासदांच्या आर्थिक स्थैर्यासाठी अत्यल्प दरात सुलभ कर्ज पुरवठा, भक्कम समुह सुरक्षा आणि दर्जेदार सेवेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यास वचनबद्ध आहे.

Contact Us

संस्थेचे सोशल मीडिया पेजेस

आजकालच्या डिजिटल युगात सोशल मीडिया पेजेस संस्था किंवा व्यवसायांसाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरले आहेत. या पेजेसच्या माध्यमातून संस्था आपले विचार, कार्य, उपक्रम, आणि ताज्या घडामोडी सहजपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकते.

Loading
Your message has been sent. Thank you!